दादरमधील कबुतरखाना बंद केल्याच्या विरोधात जैन समाजातील नागरिकांनी हवं तर त्यासाठी आमच्यावर कर लावा अशा शब्दांत निषेध केला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखाना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शासनाची तयारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीच्या बैठकीनंतर मुंबईतील कबूतरखान्याबाबत बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार, गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते. जैन समाजाने मुंबईतील कबूतरखाना बंद करण्यास विरोध केला आहे. दरम्यान हत्तीणपाठोपाठ कबुतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.