दिल्लीच्या रणसंग्रामात योगींची एन्ट्री! बटेंगे तो कटेंगे ची जादू चालणार?

बटेंगे तो कटेंगे ची जादू चालणार?

एखाद्या राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत दिसतो हे अनेकदा आपण पाहिलंय.. आता दिल्लीच्या रण संग्रामात आता अनेक गोष्टी घडतयत.. दिल्ली तिच्या राजकीय प्रवासाच्या महत्त्वाच्या वळणावर उभी आहे..महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतही भाजप चेच सरकर येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. दिल्लीच्या विधानसभेनंतर तिथल्या राजकारणात मोठी उलथपालथ होण्याची शक्यता आहे.. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सरकारच्या काळातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराने दिल्लीवासीय त्रस्त झाल्याचं बोललं जातंय..त्यामुळे यंदा जनता बदल करेल अशी शक्यता आहे..
आता दिल्लीच्या निवडणूक संग्रामात उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एन्ट्री झाली आहे.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता.. त्यांनी दिलेला हा नारा चांगलाच चर्चेत आला होता.. यावर टीका झाली असली तरी भाजप ला याचा फायदाच झाला..दिल्लीत योगींच्या 14 सभा होणार आहेत..दिल्लीतील मुस्लिम बहुल क्षेत्रात या सभा होणार आहेत.. हिंदू फायर ब्रँड अशा योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवून भाजप आता दिल्लीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाताना दिसत आहे..
दिल्लीत बदलाच्या दिशेने वारे वाहताना दिसत आहेत.. दिल्लीत यंदा बदल झाला तर भाजप साठी ही खूप मोठी आणि जमेची बाजू ठरणार आहे.. महाराष्ट्रा प्रमाणे दिल्लीत सुद्धा जात, धर्म या पलिकडे हिंदुत्वाचा मुद्दा चालला तर येणाऱ्या काळात भाजप अनेक राज्यात याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार हे नक्की..
मागच्या निवडणुकीच समीकरण बघितल तर गरीब, मध्यमवर्गीय आणि महिला मतदारांवर आप ची भिस्त आहे.. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हेच सगळे एकवटले तर आप सरकारला बाजूला सारून भाजप सत्तेत येऊ शकेल.. आप साठी अरविंद केजरीवाल हेच हुकुमी एक्का आहेत.. तर प्रतिस्पर्धी असलेल्या काँगेस आणि भाजप कडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नाहीये.. पण भाजप चेहऱ्यावर नाही तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे..
आता आम आदमी पक्ष त्यांच्या विजयाची हॅटट्रिक करेल का?
भाजप आपल्या विजयाची पताका उंचावेल?
का काँग्रेस या निवडणुकीत महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल? हे तीन प्रश्न आहेत..
प्रचार शिगेला पोहोचला असताना दिल्लीच्या भवितव्याला आकार कोण देणार या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.. आता भाजपच्या बाजूने कौल दिसत असला तरी शेवटी मतदार राजा कोणाला निवडणार हे त्यांच्या हातात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here