बँक ग्राहकांनो सावधान! एका सहकारी बँकेवर रिझर्व बँकेकडून निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं (RBI) मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (New India Co-Operative Bank) बचत, चालू किंवा इतर कोणत्याही ठेव खात्यातून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. या बंदीअंतर्गत बँकेला नवीन कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्याची परवानगी मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील.

बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं आरबीआयनं (RBI) हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बँक सातत्याने तोट्यात चालली होती. मार्च २०२४ मध्ये बँकेला २२.७८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, जो २०२३ मध्ये ३०.७५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर आणखी आर्थिक दबाव येऊ नये यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलेलं आहे. दरम्यान, बँकेचा परवाना अद्याप रद्द करण्यात आलेला नसून बँकेच्या स्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here