सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात बरीच क्रांती केली आहे.. अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत.. पण दुसरी बाजू ही जरा हिडीस आणि विकृत आहे. हल्ली युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक तरुण मुलं मुली यांना आदर्श मानतात. सोशल मीडियावरचे सेलिब्रिटी असतात हे. चांगला विचार , कन्टेन्ट असेल तर आयडॉल मानायला हरकत नाही. पण फॉलोअर्स वाढवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी हे इन्फ्लुएन्सर्स काहीही करतात, बोलतात. अश्लील कमेंट्स, कमरेखालचे विनोद हल्ली लोकांना पण खूप आवडतात.. असाच एक वाद सध्या सुरु आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका एपिसोडमुळे सोशल मीडियावरची अश्लीलता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे..
नुकतेच युट्युबर आशिष चंचलानी, कंटेंट क्रिएटर अपूर्व मुखिजा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया हे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात आले होते. यावेळी रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबाबत अश्लील असं विधान केले. आणि त्यावरून देशभरातून टीका होत आहे..
वादग्रस्त क्लिप लेखक-कथाकार नीलेश मिश्रा यांनी त्यांच्या ‘एक्स’ पेजवर शेअर केली. त्यासोबत त्यांनी असे लिहिलं होते, ‘आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलणाऱ्या विकृत निर्मात्यांना भेटा.’ ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर टीकेचा भडिमार करण्यात आला. रणवीरने केलेल्या वक्तव्याचे पडसाद संसदेत देखील उमटल्याचे पहायला मिळले आहे. मुंबई पोलिसांकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली आहे. या सगळ्या वादानंतर युट्यूबनं आता मोठं पाऊल उचललं हे. अश्लील आणि आक्षेपार्ह विधानांमुळं चर्चेत असलेला हा व्हिडिओ आता युट्यूबनं काढून टाकला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या सर्व प्रकरणाची दखल घेतली आहे. काही गोष्टी अश्लील पद्धतीने चालवल्या जात असून जे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो आणि तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे बरोबर नसून प्रत्येकाच्या मर्यादा असतात. आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत. जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सुद्धा यावर संताप व्यक्त केला.. कॉमेडीच्या नावाखाली काय सहन करावं लागतंय. आणि हे कशासाठी…तर फक्त काही व्ह्यूजसाठी. दयनीय आणि लज्जास्पद…यांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो? खरंच? हे निराशाजनक आहे!”, असं श्रेयाने म्हटलं आहे.

हा वाद इतका पेटला आहे की भाडिपा.. भारतीय डिजिटल पार्टी यांनी याचा धसका घेतला.. आणि त्याचा अतिशय निर्ल्लज कांदेपोहे हा शो रद्द केला.. सारंग साठे विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झाली आहे.. मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेनी इशारा दिला आहे. रणवीर अलाहाबादिया असं वक्तव्य करेल असं कोणाला ही वाटलं नव्हतं.. मराठीत पण असे थिल्लर चाळे चालतात.. अतिशय निर्ल्लज कांदेपोहे हा कार्यक्रम मराठी माणसाला न शोभणारा आहे.. अशी पोस्ट त्यांनी केली आहे. भाडिपा ने घाबरून कार्यक्रम रद्द केला.. असं काय आहे यात की घाबरून कार्यक्रम रद्द करावा लागला.. म्हणजे तुम्ही पण याच मार्गाला होता असं दिसतंय..
हिडीस, विकृत भाषा
हल्ली स्टँडअप कॉमेडी, किंवा हे असे युट्यूबरचे कार्यक्रम यातून नक्की काय शिकायचं.. अशा लोकांमुळे कॉमेडी किंवा विनोद बदनाम झालंय..मंदार भिडे, प्रणित मोरे किंवा असे अनेक जण आहेत..जे अश्लील भाषेत बोलतात… यांना हे विनोदी वाटतं पण ते अश्लील आणि घाणेरडच असतं… मंदार भिडे हे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या एका व्हिडिओ खाली एकाने कमेंट केली आहे की.. रणवीर अलाहाबादियाच जे झालं ते तुमचं होईल..काळजी घ्या.. त्यावर यांची प्रतिक्रिया पाहा.. या प्रकरणामुळे हे पण चर्चेत आले.. काही व्हिडिओ ठीक आहेत.. निखळ विनोद म्हणू त्याला.. पण काही व्हिडिओ हे खालच्या भाषेत आहेत..
कमरे खालचे विनोद, महिलांवर खालच्या भाषेत बोलणं, प्रायव्हेट पार्टस वर विनोद, आणि तीही घाणेरड्या भाषेत.. आई वर विनोद हा काय दर्जा आहे .. यावर तरुणाई जोरजोरात हसते, टाळ्या वाजवते.. याला रोस्ट करण असं म्हणतात.. मालिकांना रोस्ट करतात हे ठीक आहे.. पण आई वडील, आपली संस्कृती, हे कुठून आलं.. आणि यांना मिलियन फॉलोअर्स असतात.. असे अनेक नमुने आहेत जे स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली अश्लील, विकृत विधान करतात.. विनोदाचा दर्जा यांनी अश्लील करून ठेवलाय..
स्टँड अप कॉमेडी कशाला अश्लील कॉमेडीच म्हणा ..
इंडियाज गॉट लेटेंट’ चा रणवीरच्या व्हिडिओ नंतर अपूर्वा मुखिजा हिचा पण एक व्हिडिओ व्हायरल होतोय.. अरे काय ही भाषा.. असे कार्यक्रम आपण फॅमिली सोबत बसून बघू शकतो का? शिव्या, हिडीस भाषा अश्लील कमेंट्स याशिवाय हे शो चालतच नाही.. अशा शोज बंद करायला पाहिजे.. यातून काही शिकायला मिळत नाही.. आपल्याच संस्कृतील कशी नाव ठेवायची हे आपण शिकतो.. आणि संस्कृती, आई वडील, लैंगिकता, यावर घाणेरड्या भाषेत बोलून लाखो रुपये कमावतात…आता काय म्हणावं याला.. नंतर माफी मागून, व्हिडिओ डिलीट करून शो रद्द करून काही उपयोग नसतो.. तुमच्या या कामातून तुम्ही आख्या तरुणाईला विकृतीकडे नेत आहात..
चुकीच्या गोष्टी माणूस पटकन शिकतो आणि या अश्लील, हिडीस विकृती हल्ली वाढत चालल्या.. हे असे शोज यातली भाषा हेच त्याला कारणीभूत आहे.. हा शो चर्चेत आला पण असे अनेक आहेत .. त्याचं काय.. हे असे कन्टेन्ट बंद होणं गरजेचं आहे.. यासाठी काही तरी नियम असलेच पाहिजे.