दिल्लीतील काँग्रेस आणि आप यांचं सध्याचं राजकारण पाहिलं तर सूरज बडजात्या यांचे दोन चित्रपट डोळ्यासमोर येतात.. लोकसभा निवडणुकीच्या काळात हम साथ साथ है हे सुर ऐकू येत होते तर आता दिल्ली निवडणुकीत हम आपके है कौन है सुर ऐकू येत आहेत.. दिल्लीतील निवडणुकीत आप आणि काँग्रेसने एकमेकांशी फारकत घेतलीय.. इतकी की एकमेकांविरोधात प्रचार करत आहेत.. या दोन चित्रपटांमध्ये हम आपके है कौन जरा जास्त चालला.. तस आता यांच्या शत्रुत्वाची जरा अधिकच चर्चा आहे.
पण दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं आपल्याकडे म्हणतात आणि या भांडणाचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.. पण दिल्लीत आता काँग्रेस एकाकी पडली आहे.. मोठ्या कुटुंबात भांडणं झाल्यावर कस काही जण एका गटात आणि काही जण दुसऱ्या गटात असतात.. पण इथे काँगेसच्या बाजूने कोणीच दिसत नाहीये.. इंडी आघाडीतील अनेक मित्र पक्ष हे आप ला पाठिंबा देताना दिसत आहेत.. तृणमूल काँग्रेस, उबाठा आणि समाजवादी पक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पक्षांनी आप ला पाठींबा दिलाय.
निवडणुकीच्या आखाड्यात आप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय..एकीकडे प्रचार सभांमधून एकमेकांवर टीकास्त्र डागल जातंय तर दुसरीकडे सोशल मीडिया वॉर सुद्धा रंगलाय. आपकडून शनिवारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्ट मधून आपकडून भाजपासह काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलाय… यात अरविंद केजरीवाल यांचा फोटो असून “केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा सर्व बेईमान लोकांवर भारी पडेल” अशी ओळ देण्यात आली आहे. तर, त्याखाली भाजपामधील प्रमुख नेत्यांचे आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही फोटो आहे… आप च्या बेईमान लोकांच्या यादीत आता एकेकाळी मित्र म्हणवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश झालाय..
काँग्रेसने दिल्लीत ज्या आक्रमक पद्धतीने प्रचार सुरू केला तो पाहून केजरीवाल सुद्धा अस्वस्थ झाले आहेत.. काँग्रेस पूर्ण तयरीनिशी मैदानात उतरली आहे.. पक्षाला पुन्हा नव संजीवनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आप ले आपले म्हणणाऱ्यांनीच काँग्रेसला धोका दिलाय.. काँग्रेसची पार रया गेलीय. आता या दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला नव संजीवनी मिळणार की उरलीसुरली संजीवनी पण संपणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.