हिंदूंचा एखादा मोठा सण किंवा हिंदूच एकत्रीकरण ज्याठिकाणी होतं तिथे सेक्युलर लोकांचा हिंदुद्वेष जागा होतो. मग मिळेल त्या मार्गाने टीका करण्याची एकही संधी ते लोकं सोडत नाही. आणि यावर्षी तर हिंदूंचा मोठा उत्सव धार्मिक सोहळा म्हणजे महाकुंभ सुरू आहे. त्यामुळे या हिंदुद्वेषी लोकांची मळमळ सातत्याने बाहेर येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले. प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभास ‘मृत्युकुंभ’ म्हणत वादग्रस्त विधान केलंय.
सोबतच त्यांनी महाकुंभात व्हीआयपींना विशेष सुविधा आणि गरिबांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केलाय. हा सर्वप्रकार नुकताच पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला.
स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून असं ममता दीदींचं झालंय. ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत, त्यांनी महाकुभांतील मृत्यूंवर बोलणे हा राजकीय व्यभिचार आहे. स्वतः क्रूरपणे वागायचं आणि महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करायची.. मुळात तुमच्यासारख्या हिंदुद्वेषी लोकांना यावर बोलण्याचा अधिकारच नाही. मतांसाठी राजकारण करणारे तुम्ही, मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी महाकुंभवर ही असली टीका करतात.महाकुंभ दरम्यान ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. सरकारी स्तरावर त्या घटनांची चौकशी सुरूच आहे.. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत ही जाहीर केलीय.. पण म्हणून अशा दुर्घटनांच राजकीय हत्यार म्हणून वापर करणं चुकीचं आहे..महाकुंभ वर टीका करण्याआधी आपल्याच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान जो हिंसाचार झाला होता, त्यावर ममतादीदी कधी बोलणार? त्याचं स्पष्टीकरण कधी देणार?
महाकुंभात जाणार्या भाविकांच्या संख्येने यंदा विक्रमी टप्पा गाठला आहे. सामान्य भाविकांसह बॉलिवूड, हॉलिवूड चे सितारे, उद्योगपती, नोकरशाह, न्यायमूर्ती, राजकीय नेते, सगळ्यांनीच त्रिवेणी संगमात डुबकी मारण्याचा आनंद घेतला.. तिथे गेलेल्या अनेक सामान्य नागरिकांनी तिथल्या व्यवस्थेच कौतुक केलं. या महाकुंभात जाती भेद गरीब श्रीमंत हे सगळे भेद गळून पडले..हिंदू म्हणून भाविक एकत्र आले..
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ
असं वर्णन या महाकुंभच करावं लागेल.पण इतकं सगळं चांगलं, मंगल सुरू असताना काहीना नजर लावायला आवडते.. तसे हे आपले राजकारणी.. हिंदूची ही एकी, श्रध्दा पाहून हे जे हिंदुत्वाचा खोटा बुरखा घेतलेल्या लोकांना धडकी भरली.. म्हणून टीका करत सुटले आहे.. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी तर महाकुंभला फालतू असं म्हटलं.

यांच्या या टीका ऐकून कोण यांना हिंदू म्हणेल.. हज यात्रा किंवा इतर धर्मांच्या कोणत्याही परंपरेवर बोलण्याची यांची हिंमत नसते. खर तर कोणत्याही धर्माच्या श्रद्धा आस्था यावर बोलू नये पण हिंदू धर्माचा या सगळ्या सेक्युलर वाद्यांना फारच वावड आहे..आता या अती शहाण्यांमध्ये ममता दीदींची भर पडली आहे.
महाकुंभास ‘मृत्युकुंभ’ म्हणणाऱ्या ममता दीदींना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमधील राजकीय हत्यांची आकडेवारी आधी तपासून घ्यावी. जुलै २०२३ दरम्यान बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा १५ जणांची हत्या झाल्याची नोंद आहे. ममता दीदी किती क्रूर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.. ज्यांचे हात राजकीय हत्यांनी माखले आहेत त्यांनी यावर न बोललेल बर..2003 पासून पाहिलं तर त्याकाळात झालेल्या पंचायत निवडणुकी दरम्यान 76 जणांचा मृत्यू झाला होता.. 2013 आणि 2018 च्या निवडणुकांमध्येही केंद्रीय दल तैनात करण्यात आलं होतं.. पण तरीही हिंसाचार थांबला नाही..ममता दीदींच्या राज्यात निवडणुका असल्या की विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या लोकांवर हल्ले करायचे त्यांच्या हत्या करायच्या ही यांची पद्धत..आजपर्यंत सत्तेसाठी किती जणांचा जीव घेतला हे ममता दीदींनी जरा सांगाव..

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटानुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य आहे.ममता दीदींच्या काळात प. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे दुसरे पर्व सुरू झाले. ममता दीदींनी त्यांच्या काळात जो हिंसाचार झाला त्या तर ठरवून केलेल्या राजकीय हत्या होत्या. त्यावर बोला ना जरा. 2021 ची पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक हिंसाचाराने लक्षात राहिली. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यावेळेस प. बंगालचे राज्यपाल होते, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे जीव तरी वाचू शकले. त्यावेळी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.. भाजप कार्यकर्त्यांना घरात जाऊन मारलं. निवडणुकीदरम्यान राज्याबाहेर हिंसाचारपीडित लोकांसाठी छावण्या उभ्या कराव्या लागल्या होत्य. निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार करणं ही यांनी एक संस्कृती बनवली आहे.. आधी कम्युनिस्टांच्या अन्यायकारक राजवटीतही राजकीय हिंसाचार आणि रक्ताचे असेच पाट वाहायचे. आणि ममता दीदींच्या राज्यातही हेच होत आहे..
राजकीय विरोधक, इतकचं नाही तर सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, आंदोलकांचा आवाज ही इथे दाबला जातो.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2020 मध्ये 300 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे जाहीर सभेत आरोप केला होता.. पण त्यानंतर ही प्रत्येक निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.. ममता दीदी या अतिशय असंवेदनशील असून त्यांनी केलेल्या हिंसाचारकडे त्या कायमच कानाडोळा करतात.. आणि एक प्रकारे हिंसाचारच समर्थन करतात…
ही असले राजकारणी म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे.. पश्चिम बंगालमधील हिंदुनी आता जाग होणं गरजेचं आहे.. सगळ्या राज्यात ज्या दिवशी सगळे हिंदू एकत्र येऊन योग्य व्यक्तीच्या हातात सत्ता देतील तेव्हा या अशा खोट्या लोकांची पोपटपंची बंद होईल.