मनात ड्रॅगन आणि हातात चिनी ड्रोन

काँग्रेस कायमच जनतेला खोटी, चुकीची माहिती पसरवून जनतेला संभ्रमात टाकण्याचं काम करतो.. विकास, देशाची प्रगती हे मुद्दे बाजूला पण असं काहीतरी बोलायचं की जनता गोंधळात पडते. आणि त्यावरून वाद निर्माण होतो.. राहुल गांधींनी त्यांच्या अकाउंट वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.. ज्यात हातात चिनी कंपनीचा ड्रोन घेऊन ड्रोन तंत्रज्ञान आणि AI टेक्निक विषयी सांगत आहेत.. ड्रोनबद्दल भारताला फार काही माहिती नसल्याचे राहुल गांधी भासवत आहेत.. मेक इन इंडिया ही संकल्पना कशी फोल ठरली हे सांगत आहेत. आता सुद्धा भारतातील ड्रोन उद्योगाला नाकारत असून बंदी घातलेल्या चिनी डीजेआय ड्रोनचे मात्र अभिमानाने प्रदर्शन करताना दिसत आहेत. आता यांचं चीन प्रेम फारच उतू चाललंय..
भारत संरक्षण क्षेत्रात किती मागे आहे आणि चीन कसा पुढे आहे हे ते सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या चुकीच्या विधानांना ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष स्मित शाह यांनी खोडून काढलय. भारतात ड्रोन्सच्या बॅटरी किंवा इतर भाग बनवले जात नसल्याचा राहुल गांधी यांचा दावा फोल ठरवताना स्मित शाह यांनी म्हटले आहे की, भारतात ४०० हून अधिक कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रोन्स बनवत आहेत. इतकेच नव्हे तर ड्रोन्सचे भाग बनवणाऱ्या ५० हून अधिक कंपन्या भारतात आहेत. असं असतानाही असा खोटा दावा करणं हे निराशाजनक आहे.


नऊ मिनिटांचा व्हिडिओ केला आहे. यात काही प्रश्न निर्माण होतात.
चीनी ड्रोनला हे का प्रमोट करत आहेत.. म्हणजे ब्रँड अमेबसिडर आहात का त्यांचे?
ज्या ड्रोनला बंदी आहे तो दाखवून तुम्ही काय संदेश देत आहात?
भारतात ड्रोन आणि त्याचे पार्टस बनवले जातात तरी कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता की आपण यात मागे आहोत?
चीनने तुम्हाला काम दिलंय का त्यांचा ड्रोन इथे प्रोमोट करण्यासाठी? भारतातल्या ड्रोन निर्मितीबद्दल तुच्छता दाखवायची आणि चीनच कौतुक.. वा रे वा..याला आपण भारतीय म्हणायचं..

ड्रोन्स क्षेत्रात भारताने काम करायला हवे ही बाब काही आता नवी राहिलेली नाही. ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि ड्रोन्सच्या भागांचे महत्त्व भारत सरकारने २०२१ मध्येचं जाणले आहे. २०२१ मध्येचं भारत सरकारने ड्रोन्स नियम आणत याची सुरुवात केली होती. सरकारच्या त्या निर्णयामुळेच आज १७०० ते १८०० करोडोंचा महसूल यातून मिळत आहे. पण ही माहिती राहुल गांधींना नसेल.. विदेशी ड्रोन्सच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. आणि हे महाशय चिनी ड्रोनच महत्त्व सांगतायत..

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, भारतात संरक्षण सामग्रीची निर्मिती होऊच नये म्हणून कांग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात ताकदीने प्रयत्न केले. भारत आता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पावले टाकतोय, देशी ड्रोनची निर्मिती करतोय म्हणून राहुल गांधींना कसा पोटशूळ उठलाय पाहा. चीनी मालकाचे जोडे पुसण्यासाठी त्यांनी देशी ड्रोन निर्मितीला लक्ष्य केलेले आहे.

आताच संरक्षण क्षेत्रावरून पोटशूळ उठण्याच आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात संरक्षण क्षेत्रावरून महत्त्वाची चर्चा झालीय.. अमेरिका भारताला जगातील सर्वात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट F-35 देण्यास तयार आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद कैकपटीने वाढणार आहे..

बर एकीकडे राहुल गांधींचा हा व्हिडिओ तर दुसरीकडे वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं चीन बद्दल च एक वक्तव्य चर्चेत आलं. चीनपासून भारताला धोका नाही. भारत आणि चीनमधील वाद अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडला जातो, असा दावा त्यांनी केला.. चीनला भारताचा शत्रू समजण हे चुकीचं आहे.. आपण नजर बदलायला हवी.. मैत्री करायला हवी.. यांच्या हातात सत्ता दिली ना तर मैत्रीच्या नावाखाली हा प्रदेश त्यांचा असं म्हणून सगळं चीन ला देऊन टाकतील.. चीनला तर काय भारतविरोधी कुरापती करायला आवडतं.. पण भारतात राहून सत्तेत असून भारतातील विकासाच्या धोरणावर चुकीच्या पद्धतीने टीका करणं, खोटी माहिती देणं हे कितपत योग्य आहे.. मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधी परदेशी सत्तांचा आधार घेत आहेत. ही यांची देशाप्रती बांधिलकी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here