हिंदू राष्ट्र, हिंदुत्व, हिंदूंची एकजूट असे शब्द ऐकले की काहींना पोटशूळ उठतो. मग सगळी सेक्युलर पिलावळ धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव याचा प्रसार करायला लागते. लोकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणं, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या शब्दांचा प्रयोग केला जातो. आता सध्या काय झालंय काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी मनाला वाटेल ती वक्तव्य करायची. आपण कोणत्या पदावर आहोत, आपल्या बोलण्याचा लोकांवर काय परिणाम होईल याचा काही विचार करायचा नाही पण बोलायचं. मग त्या मीडियातून त्या वक्तव्याची उलटसुलट चर्चा होते, त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटतात. काही दिवस चर्चेचं गुऱ्हाळ सुरु राहतं.
ज्येष्ठ अधिवक्त्या इंदिरा जयसिंह अस म्हणाल्या की देशात धर्मनिरपेक्ष राज्यघटना अस्तित्वात असतांना हिंदु राष्ट्र कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही. अर्थात् ज्या दिवशी तुम्ही हे हिंदु राष्ट्र करण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा तुम्ही ते राज्यघटनेविना करा. आम्ही तो दिवस येईल, तेव्हा काय करायचे ते बघून घेऊ. आजच त्यावर आम्ही भाष्य करण्याची आवश्यकता नाही, न्यायमूर्ती सुनंदा भंडारे मेमोरियल लेक्चर’ चर्चासत्रात ‘इंडियाज मॉडर्न कॉन्स्टिट्युशनॅलिजम’ विषयावर त्या बोलत होत्या.

पुढे त्या असं ही म्हणाल्या की , अनेकांना प्रभू राम हीच भारताची संकल्पना वाटते पण मला ती वाटत नाही, माझ्या दृष्टीने भारताची राज्यघटना हीच भारतासंबंधी माझी संकल्पना आहे.
ज्या राज्यघटनेची त्या ग्वाही देत आहेत त्याच राज्यघटनेच्या पहिल्या छापील आवृत्तीत प्रभू राम, कृष्ण, भगवान बुद्ध अशा महान देवतांची चित्रं छापली होती. घटनाकारांनी राज्यघटना तयार करताना कायदे करताना रामायण, महाभारत, भगवद्गीता अशा प्राचीन महाकाव्यातील तत्वज्ञानाचा आधार घेतला आहे. हे कदाचित या वकील बाईंना ठाऊक नसेल.
सेक्युलॅरिझमची तुम्ही ग्वाही देतात तर एक तरी मुस्लिम राष्ट्र दाखवा की जिथे सेक्युलॅरिझम अस्तिवात आहे.. जय श्रीराम म्हंटल तर तुम्हाला एवढ टोचत का? त्यात तुम्हाला धार्मिकता दिसते. हिंदू राष्ट्र ही काही कट्टरवादी संकल्पना नाही. भारतात हिंदू बहुसंख्य आहे त्यामुळे एका अर्थाने हे हिंदुराष्ट्र आहे.. मुस्लिम बहुल राष्ट्रांना मुस्लिम राष्ट्र म्हणतोच ना..
काहींना आठवत असेल याच त्या इंदिरा जयसिंह ज्यांनी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील गुन्हेगारांना निर्भयाच्या मातापित्यांनी माफ करावं असं वक्तव्य केलं होतं.. बलात्कारासारख्या गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेसारखा टोकाचा न्याय होऊ शकतो.. पण एक स्त्री असून त्यांनी त्यावेळी केलेल हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे विकृतीच आहे..
अजून एक असच काहीही विचार न करता केलेलं वक्तव्य म्हणजे मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन याला फाशी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या महाभागांमध्ये यांचा समावेश आहे.. अफजल गुरूच्या फाशीला ही त्यांनी विरोध केला होता.. एकूणच त्यांच्या या मागण्या पाहता, वक्तव्य पाहता.. त्यांची भारतासंबंधी संकल्पना विचार काय हे लक्षात येतं..
प्रत्येक गोष्टीत बदल करता येतो.. आणि ज्या सेक्युलॅरिझम बद्दल त्या बोलतायत मुळात हा शब्द घटनाकारांनी घटनेत वापरलेला नाही.. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द जबरदस्तीने घातले. जर त्या असे करू शकतात, तर हेच शब्द संसदेत बहुमताच्या जोरावर लोकशाही (हुकूमशाही नाही) मार्गाने काढता येऊ शकतात आणि तेथे ‘हिंदु राष्ट्र’ शब्द अंतर्भूत करता येऊ शकतो, असे राज्यघटनेनेच अधिकार दिलेले आहेत.
आज भारत पुन्हा एकदा स्व ची ओळख शोधत आहे. इतके वर्ष डोळ्यावर सेक्युलॅरिझमची पट्टी जाणूनबुजून बांधली होती.. पण या ग्लानीतून आता भारतीय समाज बाहेर पडतोय त्यामुळे हे महाभाग अशी वक्तव्यं करत सुटली आहेत.. असो त्यांना खरा भारत आणि त्याची संकल्पना समजणारच नाही.