अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एआय 171 विमान अपघाताला जवळजवळ दोन आठवडे झाले आहेत. या विमानातील प्रवाशांचा आणि विमान ज्या जागी कोसळले त्या हॉस्टेलमधील नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. दरम्यानच्या काळात तज्ज्ञांनी आतापर्यंत एकूण २५९ मृतदेह ओळखले आहेत. ज्यात २४० प्रवासी आहेत. यापैकी २४० लोक विमानात होते. तर १३ जण जमिनीवर झालेल्या अपघाताचे बळी ठरले. उर्वरित ६ जणांची चेहऱ्यावरील आणि शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे. फक्त एका मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही, ज्याचा डीएनए अद्याप जुळलेला नाही. ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
ज्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही तो भारतीय नागरिक आहे. कारण विमानातील सर्व ५२ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिकाची ओळख पटली आहे. अपघातात वाचलेल्या एकमेव व्यक्तीचे नाव विश्वासकुमार रमेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.