एअर इंडियाच्या अपघात झालेल्या विमानातील सर्वच्या सर्व २४२ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुजरामधील (Gujarat) पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. तसेच यात राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचाही समावेश आहे. अपर्णा महाडिक एअर इंडियाच्या विमानात क्रू मेम्बर होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या भाचेसून म्हणजेच भाच्याच्या पत्नी आहेत. त्यांचाही मृत्यू झाला आहे.
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.