एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा जाणून घेण्यासाठी तो परदेशात पाठवण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आता यामधील सर्व डेटा सुरक्षित असून तो इथेच कलेक्ट झाला आहे. यामध्ये अपघाताचं खरं कारण आणि शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं याची माहिती आहे.
दुर्घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्सच्या एका भागाचे जास्त नुकसान झाले होते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला लागलेल्या जोरदार फटक्यामुळे हे झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच ब्लॅक बॉक्स अमेरिका, ब्रिटन किंवा सिंगापुर पाठवावा यावर विचार केला जात आहे. तर ब्लॅक बॉक्सच्या दुसऱ्या भागाची तपासणी भारतातील एका लॅबमध्ये केली जाऊ शकते.
ब्लॅक बॉक्स कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर). यांना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात. हा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या कारणाबद्दल ठोस माहिती देऊ शकतो. हा ब्लॅक बॉक्स उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांच्या हालचाली जसे की उंची, वेग आणि कॉकपिटमधील संभाषणाची माहिती रेकॉर्ड करतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्सची तपासणी केल्यावर अपघाताचं कारण उलगडू शकतं.