बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती देण्यात आली आहे. या विजयामुळे राज्यातील सहकारी राजकारणात त्यांचा पुन्हा एकदा कमबॅक झाला आहे. अजित पवार यांचं ब वर्ग संस्था मतदार संघातून 101 पैकी 91 मतांनी निवड झाली आहे. अजित पवार यांना प्रशासनाबरोबर सहकारी क्षेत्राचा ३५ वर्षांचा अनुभव असून उपाध्यक्षपदाची जबाबदारी संगीता कोकरे यांना देण्यात आली आहे.
कोकरे या नीरावागज गटातून ८ हजार चारशे चाळीत मतांनी निवडूण आल्या आहेत. संगीत कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून २५ वर्ष जबाबदारी पेलली आहे. माळेगाव पंचवार्षिक निवडणूक २५ जूनला झाली होती. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली निळकंठेश्वर पॅनेसने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहेत. अशाप्रकारे त्यांनी माळेगावची सत्ता पुन्हा खेचून आणण्यात यश मिळालं आहे.