आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण नात्याची जोरदार चर्चा सुरू असून याचदरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरची जागतिक स्तरावरही दखल घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पाकिस्तानमधील देशातील किराना हिल्स हा भागा एकाएकी गंभीर चर्चांचा विषय ठरताना दिसत आहे.
पाकिस्तानमधील किराना हिल्स भागामध्ये ‘न्यूक्लिअर रेडिएशन लीक’ अर्थात अण्विक गळतीचा दावा केला जात असतानाच अमेरिकेचं एक विमान गोपनीय पद्धतीनं पाकच्या या भागावर घिरट्या घालताना दिसल्यानं आता त्याचाही थेट संबंध या किराना हिल्सशी जोडला जात आहे.
किराना हिल्स आणि नजीकच्या भागात कोणत्याही प्रकारची अण्विक गळती झाली आहे, तर हे विमान तातडीनं त्याचं परीक्षण आणि निरीक्षण करून त्याबाबतची सावयध करणारी माहिती संबंधित यंत्रणेला जेऊ शकतं. याच कारणास्तव सध्या हे विमान पाकिस्तानात घिरट्या घालत आहे असं म्हटलं जातं आहे. असं असलं तरीही त्याची अधिकृत बातमी मात्र समोर आली नसून आता अमेरिका किंवा पारिस्तानकडून याबाबत नेमकं काय वक्तव्य केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.