देशातील मोठ्या उद्योजकांपैकी एक आणि रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याशी संबंधित विविध 50 ठिकाणांवर ED नं गुरुवारी छापेमारी केली. अनिल अंबानी समुहाच्या कंपन्यांविरोधातील आर्थिक अफरातफरीशी संबंधिक प्रकरणांमध्ये दिल्ली आणि मुंबईत ही छापेमारी झाल्याची माहिती असते.
नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनॅन्शिअल रिपोर्टींग अथॉरिटी, बँक ऑफ बडोदा आणि सीबीआय यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे, तर अनिल अंबानी यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यामध्ये चौकशी केली जात असून तत्सम ठिकाणांवरही ईडीनं छापेमारी केली आहे.