पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला होता. आता तशाच प्रकारची घटना पुन्हा घडली आहे. मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडा भुर्जीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप होत आहे.
काहीच दिवसात अशा प्रकारची दुसरी घटना घडल्यानंतर गुडलक कॅफेच्या स्वच्छतेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या गुडलक कॅफेमधून एका व्यक्तीने अंडा भुर्जी घेतली. त्या भुर्जीमध्ये त्याला मेलेले झुरळ सापडल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधित व्यक्तीने त्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच सोबत अंडा भुर्जी घेतल्याचं बिलही शेअर केलं आहे.