मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं! मराठीच्या वादावर स्पष्टच बोलले फडणवीस

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

राज्य सरकारने त्रिभाषाचा जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलैला शनिवारी विजय मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिभाषा कमिटीबद्दल पहिलीपासून १२ वी पर्यंत हिंदी सक्तीची करा. कॅबिनेटमध्ये घेणारे ते, कॅबिनेटचा निर्णय करणारे ते, निर्णयावर सही करणारे ते आणि आता विजय मेळावा घेणारेही तेच. मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतंय कोण दुटप्पी आहे. हे त्यांचं दुटप्पी धोरण आहे. आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करु. कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रात होईल. तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठी भाषा येत नाही म्हणून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोकं वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात. त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये अशाप्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीय. जर अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केली जाईल. जर मराठीचा एवढा अभिमान असेल तर मराठी शिकवा. मराठी शिकवणी सुरु करा. एवंढ असेल तर मुलांना मराठी शाळेत टाका. मग तुम्ही मुलांना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा असेल. हे एकीकडे तुम्हाला चालत आणि दुसरीकडे तुम्ही व्यापाऱ्याला मारता, हे किती योग्य आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here