अमरावतीत बड्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या

अमरावतीत वलगाव पोलीस स्टेशनचे ASI अब्दुल कलाम यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. ५ जणांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर भर रस्त्यात हल्ला केला. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ड्युटीवरून घरी जात असताना 5 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हल्लेखोरांनी आधी कलाम यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देत जखमी केले व छातीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here