महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. तसेच या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.
तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील, असं सांगण्यात आलं आहे.