महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यात उभारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात तीन हजार एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात सौरऊर्जा प्रकल्पांना चालना मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये १३१ वीज उपकेंद्र उभारले जाणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जिल्हा प्रशासनाने तीन हजार एकर जमीन महावितरणच्या ताब्यात दिली आहे. १४ तालुक्यांमध्ये १३१ वीज उपकेंद्राचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी योजने द्वारे जिल्ह्यात तीन हजार एकर सरकारी जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत.