भाजप खासदार अडकले लग्नबंधनात, कलाकाराशी बांधली लग्नगाठ

भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या गुरुवारी ६ मार्च रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांनी शास्त्रीय गायिका तथा भरतनाट्यम डांसर ‘शिवश्री स्कंदप्रसाद’ हिच्यासोबत लग्न केले. कुटुंबीय आणि काही जवळची मित्रमंडळी आदींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला. महत्वाचे म्हणजे, या लग्नसोहळ्याचे काही फोटोही समोर आले आहेत. यात हे जोडपे पारंपरीक वेशभूषेदत दिसत आहे. लग्नानंतर, आता बेंगळुरूमधील गायत्री विहार मैदानावर भव्य रिसेप्शनचेही आयोजन करण्यात येणार आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहे, शिवश्री स्कंदप्रसाद… दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी, ‘काशी यात्रा’, ‘जिरिगे बेल्ला मुहूर्त’ आणि ‘लाजा होम’ सारखे महत्वाचे विधीही पार पडले. ‘जिरिगे बेल्ला’ हे दक्षिण भारतीय लग्नांमध्ये शुभ मुहूर्ताचे प्रतिक माणले जाते. तर ‘लाजा होमात’ वधू पवित्र अग्निमध्ये तळलेले धान्य अर्पण करते. या सर्व पारंपरिक विधींसह, या दोघांनीही जीवनाची नवी सुरूवात केली आहे.

कोण आहे शिवश्री स्कंदप्रसाद?

शिवश्री स्कंदप्रसाद ही चेन्नईमध्ये राहणारी एक प्रसिद्ध कर्नाटकी गायक आणि भरतनाट्यम कलाकार आहे. तिचा जन्म 1 ऑगस्ट 1996 मध्ये झाला होता. ती मृदंग वादक सीरकाझी श्री जे. स्कंदप्रसाद यांची कन्या आहे. संगीत आणि नृत्याशिवाय, ती एक फ्रीलान्स मॉडेल आणि पेंटरही आहे. शिवश्री स्कंदप्रसाद हिच्या शिक्षणासंदर्भात बोलायचे जाल्यास, तिने सास्त्र युनिव्हर्सिटीतून बायो-इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. तसेच, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजीमध्येही डिप्लोमा केला आहे. याशिवाय, तिने मद्रास विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये मास्टर डिग्रीही मिळवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here