बिहार निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न, अमित शहांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

बिहार निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, परंतु विजयानंतर एनडीएचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत निवडणुकीनंतरच ठरवला जाईल, अशी प्रतिक्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. बिहारमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यावेळी बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. पण अमित शाहांच्या या विधानाने मात्र सस्पेन्स निर्माण केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत भाजप कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, म्हणून ते आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे नाव शेवटपर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते, पण त्यादृष्टीने इतर पावलेही उचलली जात होती. त्याचप्रमाणे भाजप बिहारमध्येही करताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या यशाचा आधार मुख्यमंत्री उमेदवारावर अवलंबून असेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयू दुसऱ्या कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवणे सहन करणार नाही. अर्थात, ही परिस्थिती त्यांच्यासाठी खूप लाजिरवाणी असेल आणि अशी घटना भाजपसाठीही धोक्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here