दिल्लीत इमारत कोसळली, आठ जणांना बाहेर काढले

दिल्लीतील सीलमपूर भागातील जनता मजदूर कॉलनीत चारमजली इमारत कोसळली. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली असून अनेक लोक आतमध्ये अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांची मलब्यातून सुटका करण्यात आली आहे. सात जणांना जेपीसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर एकावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनेकजण अद्यापही आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत ८ ते १० लोक वास्तव्यास होते. यामध्ये तीन लहान मुलं आणि तीन महिलांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here