केंद्र सरकारने 25 ओटीटी अॅप्स आणि वेबसाइट्सवर कारवाई करत त्यांना ब्लॉक केले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत केली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि अनुचित कंटेंट प्रसारित केले जात होते.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सातत्याने अश्लील, अनैतिक, महिलांचा अपमान करणारा आणि भारतीय संस्कृतीविरोधी कंटेंट प्रसारित करत असल्याने समाजात विकृती पसरवली जात होती. यावर अंकुश आणणे आवश्यक होते यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.