केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जुलै 2025 मध्ये महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) होणाऱ्या वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांचा हा प्रतीक्षेचा काळ लवकरच संपणार आहे.
यावेळी जुलै 2025 साठी DA मध्ये 3 टक्के वाढ (7th Pay Commission DA Hike) होण्याची शक्यता आहे. ही वाढ ऑक्टोबर 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. ही वाढ सणासुदीच्या काळापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल. असे असले तरी याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.