विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. विकी कौशलने या चित्रपटात मनापासून काम केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत साकारण्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. शरीरावर काम करणे असो किंवा स्टंट करणे असो, विकी कौशलने कोणतीही कसर सोडली नाही.
दुसरीकडे, रश्मिकाला या भूमिकेत पाहणे चाहत्यांसाठी खूप रंजक आहे. याशिवाय अक्षय खन्नाचे कामही उत्तम झाले आहे. सध्या हा चित्रपट थिएटरमध्ये चांगला गल्ला जमवत असला तरी ओटीटीवर हा चित्रपट कधी येणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ‘छावा’ च्या ओटीटी रिलीजची तयारीही झाली आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘छावा’चे ओटीटी स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सने ‘छावा’चे स्ट्रीमिंग हक्क विकत घेतले आहेत. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट स्ट्रीम होऊ शकतो. तथापि, अद्याप तारखेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, किंवा निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.