संतोष देशमुख प्रकारणात मोठा ट्विस्ट, ‘ही’ होती हत्यारं!

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आता मोठी माहिती समोर आली आहे.  संतोष देशमुख यांच्या अंगावर दीडशे जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या होत्या? कशा पद्धतीची ही हत्यारं होती? याची कल्पनाचित्र सीआयडीनं रेखाटली आहेत. या प्रकरणातील आरोपपत्रात या कल्पनाचित्रांचा समावेश करण्यात आला असून ती कोर्टात सादर करण्यात आली. यामध्ये गॅसचा पाईप वळवून त्याची मूठ तयार केली होती. तर लोखंडी पाईपला क्लच वायर लावली होती. ऊसतोड मुकादमांचं अपहरण करून त्यांनाही याच हत्यारांनी मारहाण केली जात होती असा पोलिसांना संशय आहे.   

दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीचा अर्ज कोर्टात दाखल झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी बीड कोर्टात करण्याची विनंती करण्यात आली आहे. खंडणी, हत्या, ॲट्रॉसिटी प्रकरणाची सुनावणी एकत्र घेण्याबाबतही अर्ज करण्यात आला आहे. बीड कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १२ मार्च रोजी देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here