वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या नगरपरिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर परिषद सीईओची स्वाक्षरी असलेलं आदेशाचं पत्र सफाई कर्मचाऱ्याच्या घरी पोहचलं. पत्र वाचून सफाई कर्मचारी देखील अवाक् झाला.
आधीच नगर परिषद शाळांची अवस्था बिकट असताना पुलगावच्या नगर परिषदेतील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. आता मात्र नगर परिषद प्रशासनाने सारवा सारव करीत क्लेरीकल चूक झाल्याचे सांगत हा आदेश रद्द करण्याची खटाटोप केला. असं धक्कादायक वास्तव समोर आलंय.