सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात तीव्र उष्णतेनंतर, देशाच्या वायव्य राज्यांमध्ये हवामान बदलले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये संध्याकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. 20 हून अधिक राज्यांमध्ये वादळ आणि पावसाची माहिती दिली जात आहे. लखनौ आणि कानपूरसह उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला. येथे वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला.

उत्तराखंड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल आणि नागालँडमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत केरळ, तामिळनाडू आणि आंध्रमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल. त्याचवेळी, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकते. पुढील दोन दिवस वायव्य भारत, गुजरात आणि महाराष्ट्रात कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये एकूण ४७ जणांचा मृत्यू वीज कोसळल्यामुळे आणि वादळामुळे झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.