पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उससली यह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्याच्या मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदनशीलतेचा परिचय आपल्याला पहायल मिळत आहे. ज्या प्रकारे तेथील डॉक्टर्सनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला. अधिकचे पैसे मागितले असा हा संपूर्ण विषय आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धर्मादाय रूग्णालयांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी या संदर्भात उच्च स्तरीय कमिटी तयार केली आहे. जी या घटनेचा तपास करेलच. पैशांची चिंता न करता रूग्णालयाने त्यांना ॲडमिट करून घेणे गरजेचे होते. मुख्यमंत्री कक्षाने देखील लक्ष घातले मात्र रूग्णालाय प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.