GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक ऍप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी त्यांना सक्षम बनवणारा हा एक टेक्नॉलॉजी- सक्षम आणि आकर्षक प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र सायबरने नमूद केले आहे की सायबर गुन्ह्यांच्या दररोज ५००० तक्रारी नोंदल्या जातात.
महाराष्ट्र सायबरचे पोलीस महाउपनिरिक्षक श्री. संजय शिंत्रे यांनी GenS Life सोबत बोलताना ज्येष्ठ नागरिक कसे फसवणुकीला सहज बळी पडू शकतात यावर प्रकाश टाकताना म्हटले, “भारतात 15 कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे डिजिटल ज्ञान मर्यादित असते आणि आर्थिकसंपत्तीपर्यंत पोहोच असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना सायबर गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने लक्ष्य बनवले जाते. डिजिटल अरेस्टच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतेही सरकारी खाते किंवा पोलीस, विमानतळ, कस्टम्स, इन्कम टॅक्स, CBI, क्राइम ब्रांच, CID, ED सारख्या कायदा अंमलबजावणी एजन्सी कधीही व्हिडिओ कॉल मार्फत चौकशी करत नाहीत.”
या गुन्ह्यांचा सामना करताना काय करावे याबद्दल सल्ला देताना श्री. शिंत्रे म्हणाले, “सायबर गुन्हेगार सतत आपल्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे जागरूकता ही बचावाची पहिली पायरी आहे. भारत सरकारने 26 लाखांपेक्षा जास्त बनावट मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत, जे सायबर गुन्ह्याविरुद्धच्या लढ्यातील एक लक्षणीय पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना अधिकृत मार्गदर्शिकांची माहिती असली पाहिजे, त्यांनी आपले मोबाइल सुरक्षित ठेवून डिजिटल स्वच्छता राखली पाहजे आणि अज्ञात कॉल आणि मेसेज नेहमी तपासून घेतले पाहिजेत. काहीही संशयास्पद वाटल्यास कुटुंबातील एखाद्या विश्वासू माणसाशी बोलावे किंवा आमच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. आपण एकत्र मिळून या धोक्यांवर मात करू शकतो.”