शिमला येथील दामिनी सिंह बराडने देशातील सर्वात कठिण परीक्षांमधील एक IIT पीएचडी एंट्रन्स परीक्षामध्ये अखिल भारतीय रँक (AIR) 1 मिळवत इतिहास रचला आहे. ती आता आयआयटी कानपूरमधून मनोविज्ञानमध्ये पीएचडी करणार आहे.
दामिनी सिंह बराडने आयआयटी कानपूरमधून लेखी परीक्षा आणि मुलाखती दोन्हींमध्ये तिने अव्वल स्थान मिळवले आहे. आता ती तिथे डॉक्टरेटचा अभ्यास करणार आहे. दामिन सिंह बराड हिने मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्ससाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या NIMHANS बेंगळुरूची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली, लेखी फेरीत यशस्वी झाल्यानंतर तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.