दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 8 फेब्रुवारीला दिल्लीचे तख्त कोण राखणार याचं उत्तर मिळेल. आता प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात होणार आहे. लोकसभेला मित्र असणारे आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. तर केजरीवाल सुद्धा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत या दोघांच्या भांडणाचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे. हम साथ साथ है असं म्हणणारे काँग्रेस आणि आप आता हम आपके है कौन असं म्हणताना दिसत आहेत. त्यावरचा हा खास व्हिडिओ नक्की पहा