दिल्ली निवडणुकीत ट्विस्ट! मतमोजणी दरम्यान बसपा उमेदवाराचा आपला पाठिंबा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. आणि आज मतमोजणी सुरू आहे. दिल्लीवर कोणाची सत्ता येणार हे आज स्पष्ट होईल. दिल्लीत आप, भाजप, आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली असून भाजप आणि आतमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आप आणि भाजपने विजयाचा दावा केला आहे. आता मतमोजणी सुरु असतांना मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अचानक बसपाच्या उमेदवाराने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच आता बसपाच्या उमेदवाराने थेट आपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. घोंडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार सुंदर लोहिया यांनी मतमोजणी सुरू असतानाही आप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टीचे उमेदवार गौरव शर्मा यांना माझा पाठिंबा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांवर चालणारा पक्ष असेल तर तो आम आदमी पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here