दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि.5) मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिल्लीत 57 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मुस्तफाबाद या विधानसभा मतदारसंघातील लोकांनी सर्वात जास्त मतदानाचा हक्क बजावलाय.
मतदानानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. चाणक्यचा एक्सिट पोलनुसार दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका करण्याची शक्यता आहे. भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाणक्यचा सर्व्हे भाजप सत्ता खेचून आणेल असा अंदाज व्यक्त करत आहे.
चाणक्य शिवाय, मॅट्रिझ आणि पोल डायरीने देखील भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे 8 तारखेला दिल्ली विधानसभेच्या निकालावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. यंदा दिल्लीत आप आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळाली.
चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला – 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप – 42-50
AAP – 18-25
कांग्रेस – 0-2
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप – 40-44 जागा
आप – 25-29 जागा
काँग्रेस – 0-1 जागा
पी मार्क एक्झिट पोल
भाजप – 39-49
AAP – 21-31
काँग्रेस – 0-1