अनामत रकमेची मागणी करणे गैर नाही, ‘आयएमए’ची भूमिका

यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, असा आदेश पुणे महानगरपालिकेने काढला. मात्र, त्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केला आहे. अनामत रकमेची मागणी करणे गैर नाही, अशी भूमिका ‘आयएमए’ने घेतली आहे.

अनामत रक्कम न दिल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीवर उपचार केले नाहीत. त्यामुळे प्रसूतिपश्चात तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरांच्या संघटनेने काढलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे की, धर्मादाय रुग्णलयांना सरकारदरबारी काही सवलती मिळतात. त्यामुळे त्यांनी अनामत रक्कम मागू नये असे सांगणे एकवेळ मान्य करता येईल; पण अनेक लहान आणि मध्यम प्रकारची रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालये यामध्ये गल्लत करू नये. सर्वाना एकाच पारड्यात तोलू नये, असे इंडियन मेडिकल असोसिएशन’ने म्हटलंय.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची समिती प्रकरणाची चौकशी करणार आहे. दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची चौकशी केली जाणार आहे. ससूनच्या चौकशी समितीमार्फत याचा तपास होणार असून मंगळवारपासून प्रकरणाची चौकशी सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here