काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला असून, महाराष्ट्रात मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत वाढले नाहीत तितके मतदार गेल्या 5 वर्षात वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांची चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली असल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं सांगायचं तर मतांची चोरी ना महाराष्ट्रात, ना भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून त्याच गोष्टी रोज बोलतात. रोज खोटं बोलतात, पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात”.