वळसंगकर प्रकरणात आता देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री…कारण

xr:d:DAFFuQ1RO2w:174,j:30841316958,t:22071516

सोलापुरमधील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांची सून डॉ. शोनाली गायब असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. शोनाली या मुख्य संशयितांपैकी एक असून पोलीस चौकशी असतानाच त्या त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशींसह बेपत्ता झाल्या असून त्या अमेरिकेत किंवा मुंबईत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता या प्रकरणाची थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेणार का याबद्दलची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे अशा पद्धतीची मागणीच एका राजकीय पक्षासहीत ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी केली जावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ माहिती समोर येणार असल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मनीषा माने या सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. आत्महत्या प्रकरणी कुटुंबातील काही सदस्यांवर संशयाचे ढग असताना सुनबाई डॉ. शोनाली यांनी देश सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here