महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत एकत्रितपणे विजयी मेळावा घेतला. यावेळी ठाकरे बंधुंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधला. दोन भावांना एकत्र आणणं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीसांनी करुन दाखवलं, असा टोला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून लगावला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. राज ठाकरे यांनी मला श्रेय मला दिले याबद्दल फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले. रुदाली सारखे भाषण ऐकायला मिळाले.
पहिल्यांदा राज ठाकरे यांचे आभार त्यांनी मानतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळत असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या ठिकाणी रुदाली भाषण झाले.मराठीचा एक शब्दही त्यांनी काढला नाही. फक्त आमच सरकार गेले. आम्हाला सरकार मधून काढले हेच रुदाली भाषण होते, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 25 वर्षे महापालिका असताना काही काय केले? उलट मोदींच्या नेतृत्वात काम केले. त्यांच्या काळात मराठी माणूस पायउतार झाला. आम्ही विकास केल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.