मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे. परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये, जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली.
दरम्यान, येत्या २४ तारखेला या प्रकरणी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. तसेच वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खूनात नाही, खंडणी मागितली नाही असे म्हटले आहे.