कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता भाविकांना दर्शनाला येताना विशिष्ट प्रकारच्या पेहराव्यात येणे बंधनकारक असणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
मंदिरात देव दर्शनाला येताना शॉर्ट कपडे घालण्यास मनाई आहे. मंदिराच्या परिसरात येताना पारंपरिक कपडे आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे घालून प्रवेश करणे बंधनकारक आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून म्हणजे १५ मे पासून ड्रेस कोडच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.