अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच

आता अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच असणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. तीन महिन्यांत सर्व खाणपट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. येत्या तीन महिन्यांत राज्यातील सर्व खाणपट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे अवैध खननाला आळा घालण्याबरोबरच कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पाला गती मिळणार आहे. सर्वेक्षणातून मिळणारी माहिती प्रत्येक तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी लागेल आणि ती तातडीने ‘महाखनिज’ संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here