समस्त पालक आणि विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! राज्य शासनानं नवा अभ्याक्रम जाहीर करत त्रिभाषा सूत्र रद्द केलं आहे. या सुधारित अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी अशा भाषांचा समावेश असून, तिसरी ते दहावीसाठी तो लागू असेल.
राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, मूल्यशिक्षण, व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षम परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे.