सार्वजनिक गणेशोत्स मंडळांसाठी आनंदाची बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रक्कमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत. आता जुन्या नियमानुसार केवळ 2000 हजार शुल्क आकारले जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे.
मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले.