गुजरातमधील अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेदरम्यान एक हत्ती अचानक अनियंत्रित झाला आणि त्याने अचानक त्याची दिशा बदलली. हत्तीने दिशा बदलामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने वनविभागाच्या सतर्कतेमुळे हत्तीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
रथयात्रा सुरू असताना हत्ती अचानक मार्ग बदलून इकडे-तिकडे धावू लागला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की काही क्षणांसाठी वाटलं, तो हत्ती आपल्यावर धावून येईल. परिस्थिती गंभीर बनू नये म्हणून पोलिस व वनविभागाने गर्दीला शांत राहण्याचं आणि शिट्ट्या न वाजवण्याचं आवाहन केलं. काही वेळातच प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली.