केंद्राने एम्प्लाईमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं, रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जात आहे. सरकारचं या योजनेअंतर्गत २ वर्षात ३.५ कोटींहून अधिक लोकांना नोकरी देण्याचं लक्ष्य आहे.
दुसरीकडे, सरकार पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना दोन हफ्त्यांमध्ये एक महिन्याच्या पगाराच्या समतुल्य १५ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देईल. या योजनेचा उद्देश उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करताना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देणे आहे. यासोबतच, देशातील बेरोजगारी कमी करणे हे उद्दिष्ट आहे.