केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणीयेथील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल नामक मुलगी अशी मृतकाची नावं आहेत. तर त्यांचा मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबल्याने बचावला आहे.
या घटनेने त्यांच्या कुटंबीयांवर मोठा आघात झाला आहे. एका क्षणात मुलगा पोरका झाला आहे. जयस्वाल कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.