काश्मीरचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पुन्हा चर्चेत आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांवरच्या कारवाईबाबत फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. दहशतवाद्यांची घरे पाडण्याची कारवाई चुकीची असल्याचं फारुख अब्दुल्ल यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांची घरं उडवणं चुकीचं आहे, असं फारुक अब्दुल्लांनी म्हटलंय. ही वेळ सर्जिकल स्ट्राइकची नसून निर्णय घेण्याची आहे असा सल्ला त्यांनी दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांच्या वडिलांचा काय दोष? सीमेवर सैन्य का कमी करण्यात आले? पाकिस्तानींना परत पाठवणे योग्य नाही. ‘पाकिस्तानवर हल्ला कधी करायचा हे दिल्लीने ठरवावे’ ही वेळ स्ट्राइक ची नाही तर निर्णय घेण्याची आहे, असंही फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.