गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित केला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.
भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचा गणेशोत्सव १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो”.