प्रियकरासोबत पळून गेली म्हणून जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीचं नाव साक्षी असून ती 25 वर्षांची आहे. 7 एप्रिलला तिची हत्या करण्यात आली. घरातील बंद करण्यात आलेल्या बाथरुममध्ये तिचा मृतदेह आढळला. आरोपी मुकेश सिंग मुलीच्या प्रियकराला मारण्यासाठी त्याच्या मागे गेला होता, परंतु तिचा प्रियकर गावात नव्हता.मुलगी प्रियकरासोबत दिल्लीला पळून गेली होती.
आरोपी मुकेश सिंग माजी सैनिक असल्याचं सांगितलं जात आहे. एक आठवड्यापूर्वी त्याने मुलीला राजधानी दिल्लीतून समस्तीपूरला परत येण्यासाठी तयार केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी ती गायब झाली.
मुलीच्या आईने मुकेश सिंगला मुलीबाबच विचारणा केली. त्यावर त्याने ती पुन्हा घराबाहेर पडली असल्याचं सांगितलं. तथापि, नंतर तिला संशय आला आणि तिने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांच्या निवासस्थानी असलेल्या बंद बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्यांना तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सिंगची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.