युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश

युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हा भारतीय संस्कृतीच्या वारशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचे महत्त्व अधोरेखित करताना शेखावत म्हणाले की, या कालातीत कलाकृती केवळ साहित्यिक खजिन्यापेक्षा मोठ्या आहेत. आता आपल्या देशातील १४ नोंदी युनेस्कोच्या या रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

2024 मध्ये, रामचरितमानस, पंचतंत्र आणि साहित्य-लोक या तीन भारतीय साहित्यकृतींचा ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिक रीजन (एमओडब्ल्यूसीएपी)’ रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला. एकाच वेळी तीन भारतीय कलाकृतींचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1992 मध्ये सुरू झाले मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर युनेस्कोचा मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा 1992 मध्ये युनेस्कोने सुरू केलेला एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. जगातील महत्त्वाच्या माहितीपट वारशाची ओळख पटवणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांना उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही एक आंतरराष्ट्रीय नोंदवही आहे ज्यामध्ये जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक महत्त्व असलेले ऐतिहासिक दस्तऐवज, हस्तलिखिते, दुर्मीळ पुस्तके, छायाचित्रे, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग इत्यादींचा समावेश आहे. या नोंदवहीत अनेक देशांची नावे समाविष्ट आहे.

यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगभरातील प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे ही आपल्या कालातीत ज्ञानाला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जागतिक मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेची जपणूक केली आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here